धक्कादायक : चिंचवडच्या अजंठानगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहितेचा केला खून

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड येथील अजंठानगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विवाहितेचा चाकूने वार करून खून केला आहे . त्यानंतर त्यांने स्वतःवरही वार करून घेतले .शनिवारी ( दि . 1 ) दुपारी दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली . राणी सतीश लांडगे ( वय 29 ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे .

अरविंद शेषराव गाडे ( वय 30 , रा . अजंठानगर , चिंचवड ) असे आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत महिला राणी आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते . दरम्यान , त्यांच्यात ओळख झाली . अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता . याबाबत राणी यांचे पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले होते . अरविंद वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांक बदलला होता . त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने शनिवारी राणी यांच्यावर चाकूने सपासप वार करीत हल्ला केला . राणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले आहेत . त्याच्यावर पिंपरीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या प्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत .

Share this: