पिंपरी चिंचवड :लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती आहे . आण्णाभाऊ साठे यांची जयंती नागरिक मोठ्या उत्सवाने साजरी करतात . मात्र , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे . पिंपरी चिंचवडमधील निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आज अभिवादन करून पुष्पाहार घालून मानवंदना देण्यात दिली .

यावेळी बांधकाम कामगार सेनेचे- दिपक म्हेञे, दक्ष नागरिक संघटनेचे-सतीश भांडेकर, मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष – धनराजसिंग चौधरी,बाॅक्सर ग्रुपचे – राहूल विटकर, सामाजिक कार्यकर्ते-विशाल पवळ, सामाजिक कार्यकर्ते-अरविंद कलापुरे, सामाजिक कार्यकर्ते – आकाश अडागळे आणि वास्तव संघर्ष न्यूज संपादक-दिपक साबळे उपस्थित होते..

Share this: