पिंपरी फुलबाजाराचे स्थलांतर; शगुन चौकाने घेतला मोकळा श्वास

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या पिंपरी शगुन चौक येथील फुलबाजाराचे आज शनिवारी अखेर क्रोमा शेजारील जागेत स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून शगुन चौकाने मोकळा श्वास घेतला.

गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी येथील फुलबाजाराचे स्थलांतर करावे अशी मागणी होत होती. पिंपरी शगुन चौकातील रस्त्यावरच हा फुलबाजार चालत असल्यामुळे इथे नेहमीच वाहतुक कोंडी होत असे, त्यामुळे फुलबाजाराचे स्थलांतर करावे अशी मागणी होत होती. अखेर पालिकेने क्रोमा शेजारील जागा फुलबाजाराला भाड्याने देण्याचे मान्य केले आणि अखेर आज शनिवार 1 ऑगस्ट 2020 रोजी फुलबाजाराचे स्थलांतर करण्यात आले.

नोव्हेंबरमध्ये माजी महापौर राहूलदादा जाधव यांच्या हस्ते या फुलबाजाराचे उदघाटन करण्यात आले होते. हा फुलबाजार चालू व्हावा यासाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगेचा, माजी महापौर राहूलदादा जाधव, माजी आमदार नितीनआप्पा काळजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक देशमुखसाहेब, तत्कालीन पिंपरी उपबाजार प्रमुख एन. डी. घुमले, राजू शिंदे, मोशी उपबाजार प्रमुख निलेश लोखंडाचे, तत्कालीन सचिव खंडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा फुलबाजार शासनाच्या सर्व नियम पाळून सकाळी 6 ते10 या वेळेत चालणार आहे. हा फुलबाजार चालू झाल्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी सर्व आडत आज पहिल्याच दिवशी या फुलबाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Share this: