अभिनेत्री प्रिया बेर्डे नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आणखी तीन बड्या सिनेकलाकारांची होणार एन्ट्री

चित्रपट व सांस्कृतिक विभागात करणार प्रवेश

पुणे(वास्तव संघर्ष) :प्रसिद्ध कलाकार स्व.लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर अनेक सिनेकलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये एन्ट्री करण्याचे निश्चित केले असून लवकर अजून तीन प्रसिध्द सिनेकलाकार व दिग्दर्शक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

यामध्ये प्रसिद्ध सिनेकलाकार उमेश बोलके ज्यांनी ३४ मराठी सिनेमे, ४ हिंदी सिनेमे, ७ नाटक, २२ मालिका आणि १० हिंदी टीव्ही मालिकांमध्ये भूमिका बजावली आहे. त्यामध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ सारख्या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे.

हिंदी मालिका ‘प्यार की एक कहाणी’, जय श्री कृष्णा, शु फिर कोई हैं, परिचय, लागी तुझसे लगन, उतरण, सासुराल सिमरन का, सीआयडी, मन है विश्वास, क्राईम पेट्रोल अशा मालिका, त्याचबरोबर हिंदी सिनेमे फरारी की सवारी, सिंघम २, विकएन्ड, बेंजो सारख्या बड्या दिग्दर्शकांच्या सिनेमामध्ये भूमिका बजावली आहे.

तसेच लेखक, दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर यांनी आजवर लोकमान्य एक युगपुरुष,सौ शशी देवधर,उत्तरायण,मला काहीच प्रॉब्लेम नाही,गडबड गोंधळ असे अनेक सिनेमांचे लेखन केले आहेत, हास्य अभिनेते भूषण कडू ज्यांनी, एक डाव भटाचा, दगडाबाईची चाळ, नवरा माझा भवरा, टारगेट व मराठीतील प्रसिद्ध विनोदी मालिका ‘कॉमेडी एक्सप्रेस’, बिग बॉस, नाटक : आम्ही सारे फर्स्टक्लास, सर्किट हाऊस, कॉमेडी शो कॉमेडी, होणार जावई मी या घरचा, ठेचा लग्नानंतरचे घोस्ट, चेहरा फेरी, अशा लोकप्रिय कार्यक्रमात मुख्य भूमिकेत तसेच सहकलाकार म्हणून भूमिका बजावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनात कलावंतांना नेहमीच आदराचे स्थान देवून त्यांचा सन्मान केला आहे. तसेच सुप्रिया सुळे या देखील महिलाना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी,तसेच बेटी पढाव बेटी बचाव, अशा महिलांसाठी नेहमीच प्रयत्न करत असतात व अजित पवारांची कार्यशैली सर्वांना आवडणारी आहे. लॉककडाऊनचा प्रचंड मोठा फटका सिनेमासृष्टी व कालावंतांना बसला असून, कलाकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून,हे कलाकारांचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सोडवले जातात हे सर्वांना परिचित आहे.

तसेच या लॉक डाऊन मध्ये राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून नाट्यपरिषदेला ४० लाख रुपयांची मदत तसेच तमाशा कलावंत, लोककलावंत असे सगळे मिळून महाराष्ट्रात सुमारे ४ हजार कलाकारांना तीन हजार रुपये प्रत्येकी असे देण्यात आले आहेत. कलाकारांची प्रश्न समजून घेणारी व त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विश्वास कलाकारांच्या मनामध्ये रुजत आहे.याच कारणामुळे सर्व क्षेत्रातील कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग आपलासा वाटायला लागला असून अनेक दिग्गज कलाकार यापुढे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचेही कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share this: