चिंचवडच्या अजंठानगर येथे एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड येथील अजंठानगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विवाहितेचा चाकूने वार करून खून केला होता . त्यानंतर त्यांने स्वतःवरही वार करून घेतले .शनिवारी ( दि . 1 ) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अरविंद शेषराव गाडे असे मृत्यू झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. या घटनेत त्याने 29 वर्षीय महिलेचा खून केला होता. याबाबत महिलेच्या 38 वर्षीय पतीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा व घराशेजारी राहणारा होता. त्याने फिर्यादीची पत्नी हीचेकडे ” प्रेमाची मागनी करून , माझे तुझ्यावर प्रेम आहे , तु मला लय आवडते ” असे म्हणत त्यावेळी फिर्यादी यांची पत्नी त्यास नाही म्हणत असल्याने आरोपी यास त्याचा राग येऊन त्याने रागाचे भरात , एकतर्फी प्रेमातुन फिर्यादी यांची पत्नी ही कामावरुन पायी पायी घरी जात असताना तीस शिवतेजनगर फेज क्र . १८ प्लॅट नं . ५६८ चिंचवड पुणे येथील रोडवर आडवून तीचेवर चाकुने हल्ला करून तीस जिवे ठार मारले व स्वत : वर वार वरून जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत

Share this: