पिंपरी चिंचवड शहरात आज 792 नवीन कोरोना रुग्ण पाॅझिटिव्ह

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 783 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 792 नवीन कोरोना रुग्णांची आज (मंगळवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 30 हजार 619 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 590 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये निगडी (पुरुष 73 वर्षे), भोसरी (स्त्री 80 वर्षे), दिघी (पुरुष 24 वर्षे, पुरुष 52 वर्षे), पिंपरी (पुरुष 63 वर्षे), दापोडी (पुरुष 80 वर्षे), मोरवाडी ( पुरुष 70 वर्षे), वाकड (पुरुष 60 वर्षे), चिंचवड (पुरुष 47 वर्षे), पिंपळेनिलख (स्त्री 80 वर्षे), पुनावळे (पुरुष 34 वर्षे) तसेच पुणे पालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण निगडी (स्त्री 55 वर्षे), भोसरी (स्त्री 40 वर्षे, स्त्री 54 वर्षे)

शहरात आजपर्यंत 30 हजार 619 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 21, 798 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 510 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 117 अशा 627 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5313 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Share this: