प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन ;वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वास्तव संघर्ष आॅनलाईन :-प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी (70) यांचं निधन झालं आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इंदौरी यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल असे ते म्हणाले होते

Share this: