बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्वखर्चाने शिक्षक करणार पिंपरी चिंचवडमधील गोरगरिबांना दहा दिवस अन्नदान

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि रमजान ईद निमित्त शहरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण, शिक्षक महामंडळाच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी मिळून स्वखर्चाने गोरगरिबांना दहा दिवस अन्नदान करण्याचे ठरविले आहे.

त्याची सुरुवात आज शुक्रवार (दि.14) पासून आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे स्टेशन वर जाऊन करण्यात आली.
लाॅकडाऊन असल्यामुळे अनेक रेल्वेस्टेशनवर गरीबाची उपासमार होत आहे, त्याकरता महामंडळाच्या माध्यमातून एक वेळेचे जेवण पुरवण्याचा संकल्प संकल्पना महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर व महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी मांडली या उपक्रमात सर्व शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला किमान 500 लोकांना हे अन्नदान करण्यात येणार आहे.

महामंडळाचे सचिव महादेव पफाळ ,हनमंत सुतार, सुजाता चव्हाण, रफिक इनामदार, चंद्रकांत पाटील, किर्ती मोटे, अर्चना सावंत ,उमा काळे, राजू माळी , पोपट माने ,विष्णुपंत पाटील, बाळासाहेब हेगडे ,निळकंट कांबळे, प्रतिमा शितोळे, हर्षदा नळकांडे ,राम मुदगल ,आशिष मालुसरे ,राजा प्रसाद ,मनीषा पाटील,अजित गायकवाड, रवि पिल्ले, निखिल पवार आदी क्रीडा शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले.

Share this: