लेख-कविता

अजितदादा पवार हे ‘पिंपरी-चिंचवडचे’ खरे शिल्पकार

महाराष्ट्र राज्याचा अथवा शहराचा विकास करायचा असल्यास त्या अनुषंगाने प्रकल्प राबवताना कोणकोणत्या अंगांचा विचार झाला पाहिजे, याचा बारकाईने आणि पूरक विचार करणारे राजकीय नेतृत्व म्हणजे पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. एखाद्या जागेचा विकास नियोजनबद्ध करणे ही अजितदादांची खासियत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यात शहराच्या कोणकोणत्या पद्धतीच्या गरजा असू शकतात, याबाबत सखोल अभ्यास करून अजितदादांनी पिंपरी-चिंचवड शहर विकासाचा आराखडा तयार केला. परिणामी, आता प्रकल्प पूर्तीनंतर या शहराचा झालेला कायापालट पाहता उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार हे ‘पिंपरी-चिंचवडचे’ खरे शिल्पकार आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आधुनिक पिंपरी-चिंचवड घडवताना शहराच्या मूलभूत समस्यांची यादी दादांनी बनवली. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी या परिसरात आयटी पार्क तयार करुन लोकनेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारातून अजितदादा यांनी रोजगार उपलब्ध करून दिला . सुलभ दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम कशी होईल, याचा ही पूरक अभ्यास केला. यात चांगल्या दर्जाचे रस्ते, सार्वजनिक बससेवा वाढवणे, पर्यायी वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देणे इत्यादीचा समावेश आहे. याखेरीज आधुनिकीकरणाच्या प्रयत्नात शहरातील पर्यावरणाची काही हानी होणार नाही, याची नीट खबरदारी त्यांनी घेतली. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करताना अजितदादा पवार यांनी शहराच्या विकास कामांसाठी मोठ्या निधीची तरतूद केली.

दादांच्या मदतीमुळेच कुठल्याही अडचणीविना केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठीचा निधी मिळवणं सोपं गेलं. केंद्र सरकारकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जवाहरलाल राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत विविध प्रकल्प राबवण्यासाठी तब्बल 2600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानं कामाला गती मिळाली. संबंधित निधीतून घनकचरा व्यवस्थापन, रस्ते व बस वाहतूक, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागले.कोरोना काळात संपुर्ण देश आर्थिक संकटात सापडला असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मा. श्री अजितदादा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
(लेखन :विक्रम पवार मो. 96040 73265)

Share this: