बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे साहित्यक्षेत्रातील आदर्श आणि प्रभावी असे व्यक्तीमत्व होते, आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाचा आवाज सर्वांसमोर मांडला आणि अष्टपैलू साहित्यांची निर्मिती केली. त्यांच्या साहित्याचा अभ्यास देशातील तसेच विदेशातील नामवंत समिक्षक, वक्ते, लेखक, विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते करतात असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करताना महापौर  माई ढोरे बोलत होत्या.  यावेळी ५ दिवसाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे ऑनलाईन उद्घाटनही महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, नगरसदस्या सुमन पवळे, शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, माधवी राजापुरे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव,  माजी नगरसदस्य मारुती भापकर, उत्तम हिरवे, भगवान शिंदे, शशिकिरण गवळी, माजी नगरसदस्या सुमन नेटके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विजय काळे उपस्थित होते.  या कार्यक्रमास पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन उपस्थित होते.

तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष डी. पी. खंडाळे, सचिव  शिवाजी साळवे, कार्याध्यक्ष संजय ससाणे, खजिनदार नितीन घोलप, मुख्य संघटक वसंत वावरे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, मोहन वाघमारे, आबा मांढरे, संदिप जाधव, संतोष नेटके, सुरेश मिसाळ, विष्णू लोखंडे, विष्णू गायकवाड, संजय ढावरे, राजु आवठे, मधुकर गवारे, सविता आव्हाड, मुख्य मार्गदर्शक भाऊसाहेब अडागळे, प्रल्हाद सुधारे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, हनुमंत (नाना) कसबे, सुरेश जोगदंड, अण्णा लोखंडे, रामदास कांबळे, सुनिल भिसे, झुंबरताई शिंदे, केसरताई लांडगे, आशाताई शहाणे, अरुण जोगदंड, सतिश भवाळ, दत्तू चव्हाण, राम पात्रे, रविंद्र खिलारे, सहसचिव विठ्ठल कळसे, राजेश अडसूळ,  तानाजी साठे, गणेश साठे, उमेश कांबळे, सहखजिनदार बालाजी मोरे, विजय कांबळे, सल्लागार मोहन भिसे, अनिल सौदंडे, महेश खिलारे, सोशल मिडीया प्रमुख किशोर हातागळे, ऋषिकेश कसबे, पसिध्दी प्रमुख विशाल कसबे, संतोष रणसिंग, संघटक बालाजी गवारे, अविनाश लांडगे, सूत्रसंचालक भानुदास साळवे, महिला कमिटी कुसुम कदम, मिना कांबळे, पुनम क्षीरसागर, अन्नदान समिती अण्णासाहेब कसबे, संरक्षण समिती प्रमुख स्वप्रिल वाघमारे, मयूर घोलप उपस्थित होते.

कोरोनाची प्रार्श्वभूमी व रोगाचा प्रसार लक्षात घेता  नागरिकांनी घरबसल्या महानगरपालिकेच्या www.facebook.com/pcmcindia.gov.in या अधिकृत फेसबुक पेज आणि pcmcindia या युट्यूब चॅनेलवर कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले.या प्रसंगी समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे आणि मनोज तोरडमल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव शिवाजी साळवे यांनी केले.  सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक तर आभार अध्यक्ष डी.पी. खंडाळे यांनी केले

Share this: