क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गळा आवळून खून झालेल्या ‘त्या’ महिलेची ओळख पटली

चिखली (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवडमधील चिखलीत एका महिलेचा बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने गळा आवळून निघृणपणे खून केला आहे . या महिलेचा मृतदेह हातपाय बांधलेल्या आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत गुरुवारी ( दि . 5 ) सकाळी हरगुडेवस्ती , चिखली येथे आढळला .

कमल बाबूराव खाणेकर ( वय 55 रा . बद्रा स्टिल बर्क कंपनीच्या समोर , गट नं .776 , हरगुडे वस्ती , कुदळवाडी , चिखली ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत कमला उर्फ नुरजहाँ यांनी अजिज कुरेशी यांच्याबरोबर आंतरजातिय विवाह केला होता ,मात्र त्या चिखलीतील हरगुडेवस्ती येथे एकट्याच रहात होत्या. बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने कमल यांचा गळा आवळून निघृणपणे खून केला . गुरुवारी सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांना आवाज दिला . मात्र कमल यांनी प्रतिसाद दिला नाही . त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजाऱ्याने घरात जाऊन बघितले .

त्यावेळी कमल यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय नायलॉन दोरीने बांधुन , तोंडाला चिकटपट्टी लावलेली दिसली . शेजाऱ्याने घटनेची माहिती लगेच चिखली पोलिसांना दिली . पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला . त्यात कमल यांचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले . खुनाचे कारण अद्याप कळले नाही . अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: