बातम्यामनोरंजन जगतलेख-कविता

अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांची महाराष्ट्रात चर्चा ;कारण वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

दिपक साबळे..! ✍️

पिंपरी(वास्तव संघर्ष) : महिलांवरील अन्याय अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असताना अनेक सामाजिक राजकीय पक्षांनी यासाठी आवाज उठवत निषेध नोंदविला.त्यानंतर या विषयावरील चर्चा विस्मृतीत असताना सिनेअभिनेञी दिपाली सय्यद भोसले यांनी मात्र ‘दिपाली भोसले सय्यद चॅरीटेबल” ट्रस्टच्या माध्यमातून मुलींना सक्षम आणि आपल्या पायावर उभे राहण्यासाठी महिला दक्षता पथक स्थापन केला आहे. त्याची सुरुवात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थित मुंबई येथे स्थापन करत आज(दि.24) रोजी पिंपरी चिंचवड येथे महिला दक्षता पथकाचे संपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आला. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके,राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुशराव काकडे, मनसे महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रूपाली ताई ठोंबरे आणि अभिनेत्री दिपाली सय्यद उपस्थित होत्या.

अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी याबाबत ” वास्तव संघर्ष ” न्यूजशी बोलताना सांगितले की, डिबीएस अर्थात दिपाली सय्यद भोसले ट्रस्टच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवडमधील एकून 15 गरिब मुलींना प्रत्येकी पन्नास हजार रूपये फिक्स डिपाॅजिट रक्कम देत त्यांच्या लग्नकार्यासाठी प्रत्येकी एक ग्रॅम सोने मदत म्हणून दिली.तसेच अशाप्रकारे आम्ही 1 लाख गरिब परिवारातील मुलींना मदत करणार आहे. तसेच आज पिंपरी चिंचवड येथे महिला दक्षता पथक स्थापन करून महिलांना स्वयंरोजगार तसेच महिलांना सेल्फडिफेन्स कोर्स द्वारे महिला बाउन्सर्स म्हणून काम देणार आहोत. ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत तसेच जे नराधम महिलांची व तरूणीची छेडछाड करतात अशांना त्या संरक्षण देतील.

कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अशा अनेक मेसेज मला येत आहेत ताई आम्हाला काम द्या त्या उद्देशाने व महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याने दिपाली भोसले सय्यद चारीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून महिला सुरक्षा रक्षक तसेच महिला दक्षता पथक स्थापन करण्यात आले असे दीपाली सय्यद यांनी सांगितले.एकिकडे महिला सबलीकरण व महिलांचा स्वाभिमान जपत अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्व स्तरावर त्यांचे कौतुक होत असून सर्वाना त्यांचा अभिमान वाटत आहे.

पिंपरी चिंचवड येथे आयोजित दिपाली सय्यद ट्रस्टच्या उपक्रमांचे सुञसंचालन भाऊसाहेब शिंदे यांनी केले. योगेश सुपेकर गंगाराम जाधव, साहेबराव जाधव, मीरा केंदळे, सुरत पांचाळ यांचे सहकार्य लाभले.

Share this: