बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा निर्बंध ;लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास

मुंबई (वास्तव संघर्ष) :राज्य सरकारने कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी मोठा निर्णय जाहिर केला आहे.नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध होणार असल्याने यानुसार राज्यात आता लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर केवळ दोन डोस घेतलेल्यांना परवानगी असणार आहे.

लसीकरणाबाबत नवी नियमावली प्रसिद्ध करत राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.

तसेच या नियमावलीअंतर्गत कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने आता मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500 आणि संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

याशिवाय राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर 50 हजार रुपयांचा दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीसही परवानगी देण्यात आली आहे.

Share this: