धक्कादायक:पिंपरीत नऊ वर्षांच्या लहान मुलावर धारधार शस्त्राने वार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : एका नऊ वर्षांच्या लहान मुलावर धारधार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.28) रोजी दिडच्या सुमारास उमेश मेन्स वेअर दुकानासमोर , गांधीनगर , पिंपरी येथे घडली आहे.

जावेद रियाज अन्सारी  यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाबासाहेब अशोक साळवे (वय-21, रा. गांधीनगर , पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी  दिडच्या सुमारास उमेश मेन्स वेअर दुकानासमोर गांधीनगर  येथे यातील आरोपी बाबासाहेब याने काहीही कारण नसतांना फिर्यादी यांचा मुलगा  सोहेल (वय-9) याचे डाव्या गालावर काहीतरी धारदार शस्त्राने वार करून  त्याला जखमी केले व तेथून पळुन गेला. अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चाटे करित आहेत.

Share this: