क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :पोटच्या मुलीवरच नराधम बापाने केला लैंगिक अत्याचार

चिंंचवड(वास्तव संघर्ष : पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या 15 वर्षीय मुलीचा बापाने लैंगिक छळ केला. हा प्रकार 9 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत  शिवाजी चौकाजवळ वाल्हेकरवाडी येथे घडला.

पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुकुंद  केळे (वय-43, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड )असे नराधम बापाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नराधम बाप हा मजुरी काम करतो. त्याने त्याच्या आपल्या पोटच्या 15 वर्षीय मुलीचा राञी अकरा ते बाराच्या सुमारास लैंगिक छळ केला.याबाबत मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.अधिक तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक झडते  करीत आहेत.

Share this: