भोंदुबाबा विलास पवार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी; महीलेकडे केली होती शरीरसुखाची मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : महिलेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच तीला जादूटोण्याची भिती दाखवत शरीरसुखाची मागणी करणा-या बीड जिल्ह्यातील भोंदुबाबाला पिंपरी चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.

विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज ( वय 41 , रा . मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि . बीड ) असे अटक केलेल्या भोंदुबाबाचे नाव आहे .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2021 रोजी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की , विलास पवार उर्फ महाराज याने महिलेला फोन केला.तुझ्या पतीने मला फोनवर तुला कमरेच्या खाली करण्यासाठी सांगितले आहे, तसेच महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्यांचे आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून आरोपीने महिलेला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.ज्या माणसाच्या उजव्या हाताच्या तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तु शारीरिक संबंध ठेवले तर तुला कोणीही काही करू शकणार नाही , असे आरोपीने महिलेला सांगितले . त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लिल व्हिडिओ पाठवून त्यात उजव्या हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले.व्हीडीओ पाठविल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच फिर्यादीला माझेशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील . तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करून पीडीत महिलेचा विनयभंग केला . वाकड पोलिसांनी फिर्यादी महीलेच्या मदतीने 25 डिसेंबर रोजी आरोपीला पकडण्यासाठी डांगे चौक येथे सापळा लावला . आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.आरोपीला अटक केली आहे . त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर ,पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) संतोष पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव ,संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल , पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर ,दिपक साबळे,दिपक भोसले,भास्कर भारती ,कल्पेश पाटील यांनी केली आहे .

Share this: