दोन तरुणांना बसखाली चिरडून पळून जाणा-या ड्रायव्हरला पोलीसांनी केली अटक

वाकड (वास्तव संघर्ष) :  पिंपरी चिंचवडमधील बारणे कॉर्नर थेरगाव येथे ॲक्टिव्हा या  मोटार सायकलवरील दोन तरुणांना  बसने चिरडले होते. ही घटना 28 डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर तो अनोळखी बसड्राव्हर घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र सिसिटिव्हीच्या माध्यमातून त्या फरार आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

प्रकाश श्यामराव बुरंगे (वय-27,रा. कुणाल हॉटेलचे मागे , वृंदावन कॉलनी, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शुभम बबन गायकवाड, (वय-20 रा. अश्विनी कॉलनी , ज्योतीबानगर काळेवाडी) हा उपचारापुर्वीच मयत झाला व अॅक्ट चालक  नंदु ज्ञानेश्वर लोखंडे हा गंभीर जखमी आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुन्हा घडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली असता प्रत्यक्षदर्शीकडून समजले की, सदरचे बसच्या खिडक्यांच्या खाली पिवळे रंगाचा रेडीयम व त्याखाली निळ्या रंगाचा पट्टा आहे. त्यावरुन पोलीस पथकाने तपास करणाऱ्या सुरुवात केली . सदरचा अपघात रात्रीचे वेळी घडलेला असल्याने सिसीटीव्ही फुटेज पाहणेत अडथळे निर्माण होत होते. तसेच फिर्यादी यांना वाहनाचा नंबर माहित नव्हता. तरी सुध्दा पोउपनि गणेश तोरगल , पोना अतिक शेख , पोना . प्रमोद कदम , पोना , विक्रांत चव्हाण यांनी सदरचे परीसरातील सर्व सिसीटीव्ही फुटेज चेक करुन त्यामध्ये एक संशयीत बस निष्पन्न केली . सदरची बस ही आदित्य बिर्ला हॉस्पीटल थेरगाव पुणे येथे येणार असलेबाबतची माहीती मिळाली त्याप्रमाणे सदरचे भागात सापळा लावून निष्पन्न झालेली संशयीत बस नजेरत येताच त्यास थांबवून त्यावरील आरोपी ड्रायव्हर  प्रकाश याला अटक करण्यात आली. बस भरधाव वेगात चालवित नेवुन समोरुन येणारे ॲक्टीका वरील दोन तरुणांना धड़क दिली, मात्र अपघातानंतर घाबरल्याने तेथून पळुन गेलो असे सांगुन आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त  डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहा, पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत दिसले,  यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , संतोष पाटील पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सपोनि . संतोष पाटील , सपोनि श्री अभिजीत जाधव , पोउपनि गणेश तोरगल , पोना प्रमोद कदम , पोना , अतिक शेख , पोना विक्रांत चव्हाण यांनी मिळुन केली आहे .

Share this: