क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ‘यशवंती’संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

मावळ (वास्तव संघर्ष) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे खुर्द येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे खुर्द येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश दिवटे, प्रमुख पाहुणे झुंज दिव्याग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे,महिला अध्यक्ष नुतन रोहमारे,सामाजिक कार्यकर्ते योगेश दमकोंडवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश रोहमारे, शाळेचे मुख्याध्यापक संजय जगताप सर गावचे सरपंच व सदस्य मंडळी उपस्थित होते.

Share this: