बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करा ;महापौर माई ढोरे

पिंपरी(वास्तव संघर्ष) : बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकत कर पुर्णपणे माफ करुन शहरातील निवासी मिळकतधारकांना दिलासा देणेबाबतची मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राव्दारे केली आहे.

पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगारनगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. सध्या कोरोना विषाणूचे संकट पूर्णत: टळलेले नसल्याने बरेच उद्योग, व्यवसाय हे पूर्वपदावर आलेले नाहीत.

त्यामुळे शहरातील अनेक गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार वर्गाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता 500 चौरस फुटा पर्यंतच्या निवासी घरांचा मालमत्ता कर रद्द केल्यास सर्व सामान्य मिळकतकर धारकांना दिलासा मिळेल.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे यांचे अध्यक्षतेखालील महापालिका सर्वसाधारण सभेत पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील 500 चौरस फुटा पर्यंतच्या निवासी मिळकतींचा कर माफ करण्याचा ठराव मंजूर झालेला आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 500 चौरस फुटा पर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर बृहन्मुंबई महापालिकेप्रमाणेच माफ करणेत यावा अशी महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.

Share this: