भावानेच बहिणीवर केले सत्तुराने सपासप वार
चिंचवड (वास्तव संघर्ष) : चारित्र्याच्या संशयावरून भावानेच बहिणीवर सत्तुराने वार केला आहे. ही घटना सोमवारी (दि.11) दुपारी साडेतीनच्या सुमारास आहेर गार्डन शेजारी वाल्हेकरवाडी येथे घडली आहे.
याबाबत एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सुभाष नामदेव गायकवाड ( वय-40 मु.पो. नाव्हरे जिल्हा पुणे ता. शिरूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आरोपी सुभाष हा नात्याने मेव्हणा लागत आहे. आरोपी सुभाष याने त्याच्या बहिणीवर चारित्र्याचा संशय घेवुन जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात सत्तुराने वार करून गंभीर जखमी केले. त्याचवेळी फिर्यादी महिलेची आई ही भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडली असता तिला देखील जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या ही डोक्यात व हातावर आरोपी सुभाष याने वार करून गंभीर जखमी केले आहे. आरोपी सुभाष याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.