क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तडीपार आरोपीला धारदार शस्त्रासह पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेल्या एका आरोपीला कोयता भाले या धारदार शस्त्रासह पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.02) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजमाता काॅलेज शेजारी दत्त मंदिर जवळ भोसरी येथे घडली आहे.

पोलिस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दत्ता एकनाथ लोणकर (वय-36, रा. विठठलनगर झोपडपटटी भोसरी) असे अटक केलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यांचे आदेश झाले असतानाही त्याने महाराष्ट्र शासनाची अथवा पोलीस उपआयुक्त परिमंडळ – 1 पिंपरी चिंचवड यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता , वावरत असताना मिळून आला आहे. तसेच त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हददीत कोयता, सोटे, भाले, धारदार हत्यार स्वतः जवळ बाळगले स्थितीत मिळुन आलेला आहे. आरोपी दत्ता याच्यावर पोलिसांनी आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Share this: