राज्यसभेचा विजय आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित-देवेंद्र फडणवीस

पिंपरी (वास्तव संघर्ष) : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लागली. त्यामध्ये भाजपाचा विजय झाला. मात्र हा विजय आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो. गंभीर आजारी असताना देखील जगताप मतदानासाठी हजर राहिले. त्यांचे मत मोलाचे ठरल्याचे गौरवोद्गार विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मात्र तरी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी जाण्याचा हट्ट धरत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे हे मत मोलाचे ठरले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आम्हाला एक मत नसले तरी हरकत नव्हती, मात्र जगताप यांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे असल्याचे देखील फडणवीस यांनी कुटुंबियांना सांगितले होते.

मात्र एवढ्या आजारात देखील मतदानाला जाण्याचा हट्ट आमदार जगताप यांनी धरला. त्यांनी मतदान केले. त्यामुळेच भाजपाच्या उमेदवाराच्या विजयात त्यांचा वाटा देखील मोलाचा आहे. त्यामुळे हा विजय आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करत असल्याचे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विषयी केले

Share this: