म्हणून ‘त्या’ भाईंनी थेट पोलीस चौकीच फोडली

पिंपरी (वास्तव संघर्ष):आम्ही इथले भाई आहोत, आमचा नाद करायचा नाही असे म्हणून टोळक्यांनी पोलीस चौकीची बाहेरील काच फोडून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि.12) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास काळेवाडी पिंपरी येथे घडली आहे.

ऋषिकेश शाम कुडवे (वय-24, रा. ज्योतिबा मंगल कार्यालयाच्या मागे काळेवाडी पिंपरी )यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आमन शेख ( रा. पिंपरी),सागर तेलंग( रा.भिमनगर पिंपरी),धनंजय काळे( रा.भारतनगर पिंपरी), आकाश पवार( रा. काळेवाडी पिंपरी),अजय कांबळे (रा. थेरगाव पिंपरी ),सत्यम भारंबे (रा.भारतमाता चौक काळेवाडी पिंपरी ), सैफ खान (रा. काळेवाडी), अविनाश उर्फ काळ्या (रा. पिंपरी गाव)शुभम मोहिते, यश देशमुख (दोघे रा. भारतनगर पिंपरी)या आरोपींविरुद्ध विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी आकाश पवार याने कोयता मारून ओंकार ढवळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या छातीवर कोयता मारून जखमी केले. तसेच आरोपींनी कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पुढे कोणी याल तर ठार करीन, अशी धमकी आरोपींनी दिली.त्यामुळे फिर्यादी व त्यांचे दोन मित्र जीव वाचविण्यासाठी काळेवाडी पोलीस चौकीमध्ये जात होते. त्यावेळी आरोपींनी दगड मारून पोलीस चौकीची बाहेरील काच फोडली.तसेच तेथे मोठमोठ्याने आरडाओरडा केली. “आम्ही इथले भाई आहोत,आमचा कोणी नाद करायचा नाही” असे म्हणून आरोपींनी दहशत निर्माण केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहे.

Share this: