पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले स्वागत 

पिंपरी(वास्तव संघर्ष) : हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तसेच पालखी मुक्कामाच्या दिशेने निघालेल्या पालखीचे काही अंतरापर्यंत सारथ्य देखील केले.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी दिंडी प्रमुखांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन स्वागत करुन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यासपुस्तिका दिंडी प्रमुखांना भेट देण्यात आली. भक्ती शक्ती चौक निगडी येथे झालेल्या स्वागतावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, सह शहर अभियंता संजय खाबडे, संदेश चव्हाण, सतीश इंगळे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, रवींद्र पवार , विजयकुमार काळे , मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त सिताराम बहुरे, उमाकांत गायकवाड, अभिजीत हराळे, शितल वाकडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड,संतपिठाच्या संचालिका स्वाती मुळे, संचालक राजु महाराज ढोरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह मोहिम सुरु करण्यात आली आहे. शिवाय प्लास्टिकमुक्त वारीची संकल्पना देखील राबवली जात आहे. त्यादृष्टीने माहिती देण्यासाठी महापालिकेने चित्ररथ तयार केला आहे. या रथाद्वारे स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. या आताच्या उद्घाटन राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 360 अंशात गोलाकार फिरणाऱा सेल्फी पॉइंट महापालिकेने भक्तीसाठी चौकात उभारला होता. मी स्वच्छाग्रही, प्लास्टिक वापरणार नाही, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल, मी परिसर स्वच्छ ठेवेल असे विविध संदेश या सेल्फी पॉइंटद्वारे देण्यात आले.

दरम्यान, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज आकुर्डी येथे मुक्कामासाठी विसावला. मुक्कामाच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत शिवाय या ठिकाणी कंट्रोल रूम देखील तयार करण्यात आली असून आपत्तीविषयी नियंत्रणाचे काम या कंट्रोल रूम द्वारे होणार आहे

Share this: