धक्कादायक :तरुणीला विवस्त्र होऊन व्हिडिओ काॅल करण्याची मागणी

चिंचवड (वास्तव संघर्ष) :शारीरिक संबंधाची मागणी करत तरुणीला शरीरावरील पुर्ण कपडे काढुन व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करणा-या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना चिंचवड परीसरात बुधवारी (दि. 22) रोजी सातच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत पिडीत फिर्यादी तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शुभम मनोहर पवार (वय-23, रा. लखमापुरी ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड परीसरात बुधवारी रात्री सातच्या सुमारास फिर्यादीच्या आईच्या नात्यातील मुलगा आरोपी शुभम याने फिर्यादीला लग्नाची मागणी घातल्याने फिर्यादीने त्याला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या आई वडीलांना लग्नाबददल विचारुन सांगते असे म्हणाल्याने आरोपी शुभम याने फिर्यादी तरुणीला फोन करुन तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली आणि मला पुर्ण कपडे काढुन व्हिडीओ कॉल करुन तुझे शरीर दाखव असे म्हणाल्याने फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न झाल्याने फिर्यादीने त्याला नकार दिला.

त्यानंतर आरोपी शुभम याने फिर्यादीला तुझ्या घरच्यांना आत्महत्त्या करायला प्रवृत्त करेन असे म्हणुन धमकी दिली. तसेच नंतर वारंवार फोन करुन तु माझेशी लग्न नाही केले तर मी आत्महत्या करेन असे म्हणुन धमकी दिली.तुझ दुसर्‍या मुलाबरोबर अफेर आहे,मला धोका दिला तर,तु मला नाही तर तुझी पुरी जिंदगी बरबाद करीत असे म्हणुन फिर्यादीस फोन करून धमकी दिली तसेच आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर रिक्षा घेवुन आला त्यावेळी त्याने फिर्यादीचा पाठलाग केला व नंतर फिर्यादीच्या आईचे फोनवर फोन करुन भेटायला येती का नाही असे म्हणत धमकी दिली आहे. आरोपी शुभम याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Share this: