बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत – वैभव छाजेड

पिंपरी (वास्तव संघर्ष): वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून  भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारवर निशाणा साधत शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष वैभव छाजेड यांनी वाढती महागाई रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत नाहीतर देशभरातील सामान्य माणसाच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल असे आवाहन केले. 

देशासमोर महागाईचे मोठे आव्हान असून, केंद्र सरकार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.केंद्र सरकार महागाई आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी  कसलेही पाऊल उचलताना दिसत नाही. ज्याप्रमाणे आज जी महागाई झाली आहे. त्याप्रमाणे जनतेचा किंवा व्यापाऱ्यांचा काहीच फायदा झाला नाही महागाईमुळे सर्वसामान्यांची हालत खूप खराब आहे.

त्यामुळे जनतेचा पगार वाढ  व व्यापाऱ्यांच कमिशन वाढ लवकरात लवकर करावा तसेच गाडी वाहतूकदारांना डिझेल पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे त्यांना सुद्धा भाडे सुद्धा परवडत नाही  सरकारने याकडे लवकर लक्ष द्यावे असेही वैभव छाजेड यांनी म्हटले आहे.

Share this: