काय सांगता…अश्विनी जगताप यांना कलाटेंचा जाहीर पाठिंबा
पिंपरी(वास्तव संघर्ष): भाजप आणि महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या भागात राहणाऱ्या कलाटे आणि वाकडकर कुटुंबांसह येथील सर्व जनता लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच वाकडची जनता कमळाच्या चिन्हावर मतदान करून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करणार असा विश्वास व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण जगताप कुटुंब सुद्धा प्रचारात उतरले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड भागात घरोघरी नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्व नागरिकांना भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारपत्रकाचे वाटप केले.
यावेळी भाजपचे चिंचवड विधानसा प्रभारी संतोष कलाटे, विशाल कलाटे, राम वाकडकर, भारती विनोदे, अमर भूमकर, गणेश आल्हाट, श्रीनिवास कलाटे, अमोल कलाटे, विक्रम कलाटे, प्रदीप कलाटे, संजय भुजबळ, राजेंद्र विनोदे, कुणाल वाव्हळकर, बजरंग कलाटे, कालिदास कलाटे, सुदेश राजे, दिलीप भूमकर, संतोष बिनगुडे, नितीन केमसे, प्रमोद भुजबळ, सुरज भुजबळ, सन्नी भुजबळ आदी उपस्थित होते.
त्यांच्या या प्रचारात वाकड भागातील कलाटे आणि वाकडकर कुटुंबांनी साथ दिली. वाकडच्या विकासात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचाच मोठा वाटा आहे. अन्य कोणी कितीही बढाया मारल्या तरी लक्ष्मणभाऊ जगताप यांनीच वाकडचा कायापालट केला. आज या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे येथील कलाटे आणि वाकडकर कुटुंबांसह येथील सर्व जनता पोटनिवडणुकीत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. वाकडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.