बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

महाराष्ट्र प्राईड अवार्ड्स 2023 समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी (वास्तव संघर्ष): छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ASM CSIT कॉलेज पिंपरी येथे DFL अवार्ड्स – डिफेन्स फोर्स लीग द्वारे महाराष्ट्र प्राईड अवार्ड्स 2023 समारंभ पार पडला.औद्योगिक शिक्षण मंडळाच्या संस्थापिका डॉ. आशा पाचपांडे यांना भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलिकांत पेटकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रो. अनीता सुळे (आर्ट कल्चर), श्री नीलेश नेवाळे (सोशल वर्क), श्री शंकर काळभोर (सोशल वर्क), डॉ. विभा झुतशी (हेल्थकेअर), श्री अनिल शेटे -सीईओ श्री ओंम टेकनो सर्विसेस (बेस्ट उद्योजक), एडवोकेट लीना ठाकूर- टीम इन्फिनिटी पेटंट कन्सल्टंसी (रिसर्च),बॉडीबिल्डर श्री संदेश नलावडे (फिटनेस), पॉवरलिफ्टर स्पोर्टसमन आदर्श पवार (स्पोर्ट्स), श्री प्रमोद नायक – सीईओ अपर्णा इंडस्ट्री (बेस्ट कंपनी- स्पेस रिसर्च, हेल्थकेअर), डॉ. विनायक पाटील (हेल्थकेअर), श्री बाबू म्हेत्रे () विजय गोसावी- डायरेक्टर यू एस डी एल एल पी (यंग अचीवर), अमेय अजगर- स्किलइलेक्ट्रोनिक (यंग अचीवर), स्वराज पेठे (पेठे कंस्टरक्शन -बेस्ट सपोर्टिंग कंपनी) यांना भारतीय सैन्यातील वॉर हिरोंच्या हस्ते अवार्ड्स देण्यात आले.

तसेच या प्रसंगी महाराष्ट्र डांस फॉर लाइफ आणि डिव्हाईन वॉइस ऑफ महाराष्ट्र नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गायक व गीतकार शर्मिला शिंदे , विनीता लिलाणी यांनी गायन स्पर्धेचे परीक्षण केले. गायन स्पर्धेत पहिले पारितोषिक भूमी हेगडे हिने पटकावले, द्वितीय कुशाग्र मुखेडकर, तृतीय दिव्यम पाटील व कार्तिक कांबळे यांनी जिंकले . डांस स्पर्धेचे परीक्षण सौ किशोरी इंगळे सवाई (लक्ष्य अकॅडेमी) यांनी केले ज्यात प्रथम पारितोषिक श्रावी पारिख , द्वितीय नेल्सन पनिकर व मानसी बनसोडे , तृतीय अहाणा जोइषा हिने पटकावले , तसेच नृत्यशक्ति डांस ग्रुप ने डुएट मध्ये पारितोषिक पटकावले. इन्फिनिटी रेडियो 90.4 एफएम ने संगीत स्पर्धेत सहयोग केला.

गीतकार विनीत लिलानी यांचा लाइफ इज ब्युटिफुल गाण्याचा पोस्टर चे अनावरण करण्यात आले.डि एफ एल अवार्ड्स कमिटी मध्ये पद्मश्री मुरलिकांत पेटकर, डॉ. अमित दुबे (इंडियन एयर फोर्स ,डायरेक्टर ऑफिसर करियर अकॅडेमी), डॉ. एस बी माथुर (डायरेक्टर- ए एस एम ग्रुप इंस्टीट्यूट), प्रो. नंदकिशोर जगदाळे (प्रेसिडेंट- भारतीय टेक्निकल इंस्टीट्यूट), श्री नंदकूमार कासार (सीईओ – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ), श्री दत्तात्रय कुलकर्णी (इंडियन नेवी), डॉ. बरकत मुजावर (डायरेक्टर – डी वाय पाटील यूनिवर्सिटी), श्री संतोष गुरव , श्री गोपाल वाणखेडे (इंडियन एयर फोर्स) यांचा समावेश आहे.

समारंभाचे आयोजन डी एफ एल ग्रुप चे संस्थापक श्री नरेश गोल्ला, डीएफएल अवार्ड्स संचालक – श्री सिद्धराम बिराजदार, डीएफएल टेक्नॉलॉजी संचालक श्री राजेंद्र जाधव, डिफेन्स फोर्स लीग पॅरा विंगचे अध्यक्ष कमांडो रघुनाथ सावंत, आर्मी विंगचे अध्यक्ष सुभेदार मेजर यशवंत महाडिक, डीएफएल लेट्स गो हॉलिडेज संचालक मुजीब खान, डीएफएल संचालक श्री सुनील वडमारे , ,श्री अजय खोमणे, श्रीहरी सोनकांबळे, नीलेश विसपुते , दृष्टी जैन ,ऋषिकेश जाधव , ऋतुराज आपराजित, ईश्वरी गोल्ला यांनी केले होते.

सूत्रसंचालन श्री निलेश विसपुते, श्री शामकांत शिसोदे , अमेय अजगर यांनी केले.प्रमुख पाहुणे उपस्थिती प्रोफ. आर वी सराफ (मराठी विज्ञान परिषद), ए एस एम ग्रुप चे डायरेक्टर , प्रिन्सिपल , शिक्षकवर्ग ,माजी सैनिक कॅप्टन राजकुमार पवार, कॅप्टन दत्तात्रय वर्पे, सुबेदार विकास शिंदे , सुबेदार श्रीकांत होणमोरे , एक्स कमांडो अरुण पवार , सार्जंट एम एम बराटे, हवालदार पडवळ, पिसे, सुबेदार लोकरे , सार्जंट संगीतराव होते.
डिफेन्स फोर्स लीग तर्फे शहरात विविध राज्यस्तरीय व नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धेचे हॉट असते . इंडियन आर्मी वॉर हीरो , सायंटिस्ट , पोलिस , अधिकारी यांच्या सहभागाने डिफेन्स फोर्स लीग विद्यार्थी व समाजातील विविध लोकांसाठी काम करते . नो युवर आर्मी ही मिशन 2 वर्षापासून कार्यरत आहे ज्याचा मध्ये आपल्या विविध कला गुणांना वाव दिली जाते.

Share this: