चर्चा तर होणारच:पिंपरी चिंचवडमधील पोलीस ड्रीम 11 वर झाला करोडपती

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला ड्रीम 11 या फॅनटशी अॅपवर तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे या फॅनटशी अॅपची शहरात एकच चर्चा होत आहे.
सोमनाथ झेंडे असे हे बक्षीस जिंकणाऱ्या उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत असतात. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन टीम लावली होती.
सोमनाथ झेंडे यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केली होती. त्यांनी कालच बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती टीम एकनंबरवर आली. त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. ड्रीम इलेव्हन ही एकप्रकारे लाॅटरी पध्दत असून त्यावर बंदी आणण्याची मागणी सतत केली जाते मात्र पोलीस उपनिरीक्षकाला लागलेली ही लॉटरी सर्वाच्या भुवया उंचावत आहे.