बातम्या

कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस देऊ नका -युनुस पठाण 

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कामचुकार, निष्क्रिय, अकर्तव्यदक्ष ,कामात दिरंगाई करणारे ,भ्रष्ट कर्मचारी अधिकारी कर्मचारी  यांना दिवाळी बोनस देऊ नये यासाठी युनुस रशीद पठाण यांनी पालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आहे.

युनुस पठाण यांनी पत्रात म्हटले आहे की, आपल्या महानगरपालिकेत प्रशासनाचे हित जपण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक हित संबंध जपण्याचे काम प्रशासन राजवटीमध्ये राजरोसपणे सुरू आहे .त्यातच अनधिकृत बांधकामांना अभय देणे ,तक्रार देऊनही कारवाही न करणे , तक्रारदाराची दिशाभूल करणे ,संबंधित तक्रारदाराची गोपनीय माहिती संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना पुरवणे, दबावाला बळी पडणे, धाडसी कारवाई करण्यास घाबरणे ,कर्तव्यात कसूर करणे, बीटनिरीक्षक व इतर हस्तकांरवी अनधिकृत बांधकाम धारकांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून भ्रष्टाचार करणाऱ्या अनुक्रमे 1) श्री अण्णा बोदडे (सहा आयुक्त) 2)शितल वाकडे (क्षेत्रीय अधिकारी ग प्रभाग) 3)सुचित्रा पानसरे (क्षेत्रीय अधिकारीअ प्रभाग )4)श्री. अमित सर (ज्युनिअर इंजिनिअर) 5)माधुरी पडवळ(जे ई) 6) श्री रामगुडे( जे ई झो.नि.पू) यांना दिवाळी बोनस देऊ नये .

उलट पक्षी यांच्या वाट्यातील बोनस इतर कर्मचारी अधिकारी यांना वाटप करावा कारण संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामचुकार व निष्क्रिय वृत्तीमुळे त्यांना बोनस घेण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण वर्धापन दिनाचे औचित्य साधून सानुग्रह बोनस देत आहात हे खरंच कौतुकास्पद आहे.जे अधिकारी कर्मचारी प्रामाणिकपणे ,कर्तव्यदक्षपणे काम त्यांना वाढीव बोनस देण्यासही हरकत नाही .पण जे कर्मचारी निष्क्रिय ,कामचुकार, कामात दिरंगाई करतात फक्त हजेरी भरण्याचे काम करतात अशांना बोनस देण्यात येऊ नये अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

Share this: