क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगला भीषण आग 

पिंपरी(वास्तव संघर्ष): नेहरूनगर येथील विठ्ठलनगर  पुनर्वसन प्रकल्प बिल्डींग नंबर -5 बालाजी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी रविवारी (दि-24) मध्यरात्री 1 च्या सुमारास पार्किंग मध्ये भीषण आग लागली यामध्ये 20 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर वसाहत येथे बिल्डिंग नंबर पाचच्या समोर असलेल्या एका घराला रविवारी मध्यरात्री आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. काही वेळेत आगीने रौद्ररूप धारण केले.स्थानिक नगरसेवक राहुल भोसले यांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. घराच्या आजूबाजूला पार्क केलेल्या 20 वाहनांना आगीच्या झळा पोहोचल्या. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Share this: