क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिकअपच्या धडकेत पायी जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पायी चालत जाणाऱ्या शेतकऱ्याचा पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. चाकण ते शिक्रापूर महामार्गावर भोसे गाव येथे मंगळवारी (दि. २६) हा अपघात झाला.

मल्हारी गोविंद गाडेकर (वय ४८, पठारेवस्ती, भोसे) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी शरद अंकुश गाडेकर (वय २८) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिअकअप चालक सुनील संजय इंगळे (वय २३, रा. बुलढाणा) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्हारी हे शेतीची कामे करून घराकडे पायी चालत जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगाने चालवून मल्हारी यांना धडक दिली. त्यामध्ये मल्हारी हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलिस तपास करत आहेत.

Share this: