क्राईम बातम्याबातम्या

दारूच्या नशेत घरात घुसून महिलेचा विनयभंग

तळेगाव –  घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १२) घडला. याप्रकरणी नातेवाईकांत खळबळ उडाली असून पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे विशेष म्हणजे घरात इतर सदस्य असताना देखील हा प्रकार घडला.

विजय अर्जुन जठार (रा. लक्षदीप सोसायटी, तळेगाव. ता मावळ, सध्या रा. खडकी पोलीस लाईन) याच्या विरूध्द तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा पीडित महिलेचा नातेवाईक लागतो. दारूच्या नशेत घरात घुसून २७ वर्षीय महिलेचा हात धरला. त्यांच्याशी झटापट करून आश्लिल भाषेत शिवीगाळ केली. मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून विजयवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विजय हा पीडित महिलेचा नातेवाईक लागतो, असे पोलीस फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Share this: