बातम्या

छोटा पेंग्विन खुश झाला असेल, आदित्य ठाकरेंवर निलेश राणेंची टिका


वास्तव संघर्ष – छोटा पेंग्विन खुश झाला असेल,त्याने मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार सुरू झाले अशी खोचक टिका महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते निलेश राणे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर केली आहे.त्यांनी ट्विटरवर आदित्य ठाकरेबद्दल ट्विट केले आहे

राज्य सरकारने डान्स बार वर लावलेली बंदी काल सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. यामुळे मुंबईच्या बारमध्ये पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे गेल्या काही वर्षांपासून मुंबईत नाइट लाइफ सुरू व्हावी या मागणीसाठी आग्रही आहेत.मुंबईतील नाइट लाइफ सुरू झाल्यास सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर येतील आणि दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवेल अशी भीती व्यक्त केली जात होती

Share this: