बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे घरोघरी पोहचवणा-या कडूबाई खरात यांचे घर सरकारने पाडले

वास्तव संघर्ष
औरंगाबाद : ‘ तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं…’ अशा भीमगीतांनी अवघा महाराष्ट्र जागवणाऱ्या भीमकन्या कडूबाई खरात यांचे पत्र्याचे घर सरकारने आज पाडले आहे. झाल्टा येथील गायरान जमिनीवर पत्र्याचे शेड टाकून राहणाऱ्या शेकडो कुटुंबांची घरे पाडण्यात आली आहेत.यातच कडूबाई खरात गेल्या दोन वर्षांपासून राहत होत्या.

औरंगाबादमधील चिखलठाणा येथे राहणा-या कडूबाई यांचं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्याचं तत्वज्ञान त्यांच्या गोड गळ्यातून काळजाला हात घालणारे गाणे सर्वत्र पसरले. ते आज गावागावांत घुमू लागले आहे. कडुबाई खरात यांनी गायलेल्या भिमागितानं महाराष्ट्रात एक क्रांती घडवली. गावागावात जाऊन प्रबोधनात्मक गाणी म्हणणा-या पञाच्या घरात रहाणार्‍या कडू बाईच्या निवाऱ्याचा प्रश्न ना सरकारने सोडवला ना समाजाने. त्यामुळे आता बेघर झालेल्या कडूबाईंना दुसरीकडे एक पत्र्याची खोली भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.दोन मुली आणि एका मुलासोबत अतिक्रमित जमिनीवर पत्र्याची झोपडी टाकून त्या राहत होत्या.

वडिलांपासून घरात सुरु असलेलं गाणं कडूबाई यांच्या गोड गळ्यात आणखी खुललं आणि या गाण्यानंच कडूबाई यांच्या जगण्याला एक आकार दिला. कडूबाई अबला म्हणून नव्हे; तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगू लागल्या. कष्टानं मिळालेली भाकरीच खाणार, अशी जिद्द घेऊन जगणा-या कडूबाई यांच्या आयुष्यात उजेड पेरणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार त्यांनी घरोघरी पोहचवला माञ कडूबाई खरात आज घरापासून वंचीत झाल्या आहेत

Share this: