बातम्यामहाराष्ट्र

आम्हाला कमीत कमी एक तरी जागा द्या, जागा न भेटल्यास दलित मतांचा फटका बसेल-रामदास आठवले

वास्तव संघर्ष आॅनलाईन
नवी दिल्ली :- शिवसेना – भाजप यांची युतीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभा – विधानसभेत त्यांचा फार्मुलाही तयार झाला आहे. शिवसेना – भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन २३ – २५ असा फार्मुलाही वापरला आहे. यामध्ये शिवसेना – भाजपने मिञपक्षाचा विचार केला नाही. असेच दिसून येत आहे. त्यात भाजपचे मिञपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ते पञकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत आरपीआय या पक्षाला कमीत-कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जागावाटपात मिञपक्षाचा विचार न केल्याने रामदास आठवले नाराज आहेत. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहोत असेही आठवले म्हणाले.

जर आमच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही तर शिवसेना भाजप पक्षाला दलित मतांचा फटका बसेल राज्यात आणि देशात पुन्हा एडिएचे सरकार हवं असेल तर आरपीआय ची मद्दत लागेल त्यामुळे आमच्या पक्षाला लोकसभा मध्ये एक तरी जागा द्या असे आठवले यांनी म्हटले आहे.

शिवसेना भाजप आणि आरपीआय या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास महाराष्ट्रात ४३-४५ जागा जिंकता येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this: