बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रामदास आठवले यांनी मातंग समाजाची माफी मागावी अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जावे-युवराज दाखले

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले पिंपरी चिंचवड शहरात आले असता त्यांच्याकडून महापुरुषाचा अपमान झाला आहे. याबाबत शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ पिंंपरी चिंचवड शहराच्या वतीने आठवले यांचा निषेध केला आहे. याबाबत युवराज दाखले यांनी पञ काढले आहे.

दाखले यांनी म्हटले आहे की, केंद्रीय समाजकल्याणमंत्री यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लिखाण केलेल्या गीताचा अपभ्रंश करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अपमान केला. या वक्तव्याचा शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ पिंंपरी चिंचवड शहराच्या वतीने जाहीर निषेध करून, पिंंपरी विधानसभेत बहुजन समाजाच्या आशिर्वादाने मातंग समाजाचा आमदार करण्याचा संकल्प करण्यात आला.

रामदास आठवलेंनी मातंग समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा नाहीतर मातंग समाजाच्या रोषाला सामोरे जावे याबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर मातंग समाज जनअंदोलन करणार. या कामी उदभवनाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी केद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांची राहील. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊसाठे यांच्या जयंती महोत्सवाच्या व्यासपीठावरून शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी जाहीर निषेध केला..

काय आहे प्रकरण

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी लिखाण केलेले वग गाणे ” माझी मैना गावाकडे राहीली, माझ्या जिवाची होतीया काहीली…! या प्रसिद्ध गाण्याचा आठवले यांनी अपभ्रंश करत” माझी मैना गावाकडे राहीली मी मुंबईला दुसरी पाहीली… असे विडंबन करत प्रसिद्धीमाध्यमासमोर म्हणाले

यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीष भवाळ, सचिव संजय ससाने, कार्याध्यक्ष आण्णा कसबे, शिवाजी साळवे, किशोर हतागळे, हनुमंत नाना कसबे, भिमा वाघमारे, गणेश साठे, सुनिल भिसे, मोहन वाघमारे ,केशरताई लांडगे, नितीन घोलप आदी मातंगसमाज व बहुजन समाज यांनी आक्रमक होऊन निषेध केला.

Share this: