पुण्यात ज्वेलर्स दुकानात भरदिवसा गोळीबार, गोळीबारांचा थरार सिसिटीव्हीत कैद

वास्तव संघर्ष –

पुण्यात ज्वेलर्स दुकानात भरदिवसा गोळीबार, गोळीबारांचा थरार सिसिटीव्हीत कैद.

पुणे/गोकूळनगर – येवलेवाडी येथील श्री गणेश ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी भरदिवसा एका कर्मचाऱ्यावर पिस्तुलातून जवळून गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने येवलेवाडीत खळबळ उडाली. अमृत परिहार (वय २७, रा. मूळ राजस्थान) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

थरार सीसीटीव्हीत कैद
हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात हल्लेखोर जवळून अमृतवर गोळी झाडत असल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोरांपैकी दोघांच्या हातात पिस्तूल होते. त्यापैकी एकाने तोंडाला रुमाल बांधलेला होता.

 

 

 

Share this: