बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील मातोश्री सामाजिक संस्थेचा पुरग्रस्तांना दिलासा ;थेट कोल्हापूरात जाऊन केली पुरग्रस्तांना मदत


पिंपरी (वास्तव संघर्ष) सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे उध्वस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व स्तरांतूनप्रयत्न होत होत आहे. अशा संकटात अवघा महाराष्ट्र एकजुटीने पूरग्रस्तांना मदत करताना दिसत आहे. पण हि मदत आणखी काही दिवस सलगपणे देणे गरजेचे असून पूरग्रस्त बांधवांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना मद्दत करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मातोश्री सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी केले.

संस्थेची टीम थेट कोल्हापूरातील तांदुळवाडी गांव. घोटावळे गांव. फूलेवाडी गांव. वाघूर्डे गांव. दोनवडे गांव. येथे पोहचली तेथील माने हाॅल येथे पूरात बेघर झालेल्या नागरीकांना जीवनावश्यक वस्तू देऊन मार्गक्रमण करत कोल्हापूर मधील अनेक छोटे मोठे गावांत जावून थेट पूरग्रस्तांना तांदूळ. गहू. पीठ. चहापावडर. साखर. मूग डाळ. मॅगे पाकिट. पोहे. रवा. खोबरे तेल. बिसलेरी बाॅक्स. बिस्किट पॅकिट. कोलगेट. ब्रश. साबन. मीरची पावडर. नविन कपडे. साडी ड्रेस. लहान मूलांचे कपडे. भांडी. बेडशीट. चादर. गोधडी.अशा जीवनावश्यक सर्वच वस्तूंच वाटप मातोश्री सामाजिक संस्थाचे माध्यमातून संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले त्यामुळे तेथील पुरग्रस्तांना मदत तर मिळालीच पण जगण्यासाठी एक दिलासा ही मिळाला.

या वेळी खंडूभाऊ शिरसाठ. दिपक कांबळे. प्रकाश झा. रविकिरण घटकार. गोरख पाटील. प्रदिप दळवी. नरसिंग माने. सचिन जाधव. अकूंश कोळेकर. माऊली जाधव. दत्ता गिरी. बाळासाहेब गायकवाड. मारूती म्हस्के. निलेश भोरे. तांदुळवाडी गांव सरपंच सिध्दार्थ कांबळे. वाघूर्डे गावचे शिवसेना तालुकाप्रमुख कृष्णाकांत शिक्रे. वाघूर्डे गावचे महिला सरपंच संगिता पाटील. व सर्वच गावातील सरपंच. पोलीस पाटील. गावक-यांनी यावेळी पिंपरी चिंचवड करांचे व मातोश्री सामाजिक संस्थाचे आभार मानले.(वास्तव संघर्ष)

Share this: