वास्तव संघर्ष बातमीचा अंदाज ठरला खरा ;पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे यांना वंचीतचा पञक काढून पाठिंबा जाहीर

दिपक साबळे… चिंचवड (वास्तव संघर्ष) चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून राहूल कलाटे यांना वंचित बहूजन आघाडीने पञक काढून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे याबाबत काही दिवसांपुर्वी वास्तव संघर्ष न्यूज पोर्टल ने राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची भेट ; उमेदवारांना वंचितचा पाठिंबा मिळण्याची शक्यता? या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीचा अंदाज खरा ठरला असून आज अधिकृत प्रसिद्धीपञक जाहीर करण्यात आले आहे.

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची काही दिवसांपुर्वी भेट घेतली होती . चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवारांनी वंचित आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी मागणी उमेदवार राहूल कलाटे यांनी केली होती.

त्यानूसार वंचित बहूजन आघाडी व भारिप कार्यकर्ते व पदाधिका-यांनी नोंद घ्यावी, असेही म्हटले आहे.राहूल कलाटे पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी आहेत. मागील वेळी म्हणजे 2014 ला शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. त्यावेळेला राहुल कलाटे सेनेचे तर लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने चिंचवडमध्ये चौरंगी लढत झाली होती.

मात्र, मोदी लाटेत लक्ष्मण जगताप ह्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, त्याही परिस्थितीत कलाटे ह्यांना दोन नंबरची मते मिळाले होते. त्यामुळे कलाटे हेच जगताप यांना टक्कर देऊन आव्हान निर्माण केले आहे.दरम्यान, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मनसेसह आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Share this: