बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विलास लांडे यांनी दहा वर्षे आमदार असताना विकासाचा पाया रचला, अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचा लांडेना पाठिंबा

पिंपरी (प्रतिनिधी) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे भोसरी मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीने या मतदारसंघाचा विकास सुरू आहे. नुसता गाजावाजा न करता प्रत्यक्षात कामे करणारा आमदार मतदारसंघाला हवा आहे. त्यामुळेच या निवडणुकीत विलास लांडे यांना परिषदेने पाठिंबा दिल्याचे परिषदेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर भुजबळ यांनी सांगितले.

परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी अॅड. भालचंद्र भुजबळ, आनंदा कुदळे, सुदाम तळेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, धनंजय भालेकर, राहुल बनकर, राजेंद्र म्हेत्रे यांच्यासह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अॅड. चंद्रशेखर भुजबळ म्हणाले, “विलास लांडे यांनी दहा वर्षे आमदार असताना भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा पाया रचला. अनेक मोठे प्रकल्प राबवून या मतदारसंघातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. त्यांचे राजकीय नेतृत्व कणखर नेतृत्व आहे. तेच या मतदारसंघाचा कायापालट करू शकतात. त्यासाठी त्यांनी पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. त्यासाठीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने विलास लांडे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अॅड. भुजबळ यांनी सांगितले

Share this: