सोशल मीडियावर राहुल कलाटेंची धूम आयटीयन्समध्ये वाढती ‘क्रेझ’ चिंचवडमध्ये वातावरण फिरलंय!


पिंपरी (प्रतिनिधी) – सर्वपक्षीय, सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा, उच्च शिक्षित उमेदवार, प्रस्थापित उमेदवार आणि भाजप सरकारच्या धोरणांविरोधातील नाराजी यामुळे वाकडमधील आयटीयन्ससह चिंचवड विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार यांची वाढती ‘क्रेझ’ आहे. सोशल मीडियावर राहुल कलाटे यांची चांगलीच धूम असून चिंचवडमध्ये वातावरण फिरलंय अशा आशयाखाली नेटीझन्सकडून त्यांना पसंतीची पावती दिली जात आहे.


शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. कमी कालावधीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा पर्याय म्हणून उमेदवारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरु आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात उच्चशिक्षित, नोकरदार, आयटीयन्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील मतदार राजा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय दिसतो. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृत केल्याने ते अधिकच चर्चेत आले. त्यात बहुजन वंचित आघाडी, मनसे, काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा दिल्याने मतदारांचे लक्ष कलाटे यांनी वेधले आहे.

सर्वपक्षियांची साथ मिळत असल्याने कलाटे चिंचवड विधानसभा मतदार संघात चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळत आहे.
मतदार संघातील चर्चेचे पडसाद सोशल मीडियावर दिसून येत आहे. राहुल कलाटे यांच्यासाठी ‘विकासाची चाहूल फक्त राहुल’, ‘नेतृत्व जनसामान्याचं’, ‘चिंचवडमध्ये इतिहास घडणार’, ‘चिंचवडचं वातावरण फिरलंय’, ‘परिवर्तन तर होणारच’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या ‘क्लिप’ला चांगले ‘व्हिव्हर्स’ मिळत आहेत. त्यांच्या ‘क्लिप’ मोठ्या प्रमाणावर ‘शेअर’ होत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या ‘फॉलोअर्स’च्या संख्येतही दिवसें-दिवस वाढ होत आहे. उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार म्हणून कलाटे यांना ‘नेटीझन्स’ची अधिकची पसंती मिळत आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबूकवर कलाटे यांचा बोलबाला आहे. ‘कमेंट बॉक्स’मध्येही त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा दिसून येत आहे.


चिंचवड विधानसभा मतदार संघात परिवर्तनाची लाट आहे. महापालिकेचे राज्य शासनाकडील प्रलंबित प्रश्‍न ठोसपणे मांडण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे. सध्याचा कारभार पाहता विद्यमान आमदार महापालिकेच्या कारभारात लुडबूड करताना दिसतात. मात्र, राज्य शासनाशी संबंधित प्रश्‍नांवर बोलताना अथवा सर्वसामान्यांमध्ये मिसळताना दिसत नाहीत. त्यामुळे राहुल कलाटे जवळचे वाटत असल्याचे काही युवकांनी सांगितले.  शिक्षणाबरोबर रोजगार आणि आरोग्याचा प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. उच्चशिक्षित उमेदवारच युवा वर्गाची अपेक्षा पूर्ती करु शकतो, असे मत काही युवकांनी व्यक्त 

Share this: