बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद;पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील रावेत येथे अशुद्ध जल उपसा केंद्र, निगडीतील जल शुध्दीकरण केंद्र आणि पिंपरी चिंचवड शहरातील पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीची कामे गुरुवारी(ता.१४) केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहील.

मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) शहरातील विविध भागात ‌उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंता प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

Share this: