मान्यवरांच्या हस्ते कन्सीव आयव्हीएफ सेंटरचे उद्धाटन

कन्सीव आयव्हीएफ सेंटरचे उद्धाटन करताना डॉ. पवन साळवे, अतिरिक्‍त आयुक्‍त उल्हास जगताप, डॉ. अनिल बनकर, डॉ. माधुरी रॉय, चेतन रॉय आदी.


पिंपरी (वास्तव संघर्ष) हिंजवडी-वाकड येथील कन्सीव आयव्हीएफ सेंटरचे उद्धाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते पार पडले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अतिरिक्‍त आयुक्‍त उल्हास जगताप, ग्लोबल मेडिकल सर्व्हीसेसचे (अमेरिका) व्हाइस प्रेसिडेंट डॉ. अनिल बनकर यांच्या हस्ते लाल फित कापून सेंटरचे उद्धाटन करण्यात आले.
इंडस इंटनरॅशनल स्कूलच्या रेवा रॉय यांनी भरत नाट्यम नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी डॉ. पवन साळवे यांच्या हस्ते कन्सीव आयव्हीएफ सेंटरच्या डिजीटल व्हीडिओचे उद्धाटन करण्यात आले. या व्हिडीओमध्ये सेंटरच्या वतीने दिलेल्या जाणार्‍या सुविधा, जनजागृती आदी बाबत माहिती देण्यात आली. पालकत्वाची स्वप्न व वस्तूस्थिती या बाबतची देखील माहिती देण्यात आली. युरोपीयन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील नागरिकांना या सेंटरमार्फत देण्यात येणार्‍या सुविधांचीही या व्हिडीओमध्ये माहिती देण्यात आली आहे.


या बरोबरच जास्तीत-जास्त लोकांपर्यंत जनजागृती व्हावी, यासाठी सेंटरच्या वतीने (वेबसाईट) संकेतस्थळ सुरू करण्यात आले. अतिरिक्‍त आयुक्‍त उल्हास जगताप आणि डॉ. अनिल बनकर यांच्या हस्ते www.conceiveindiaivf.com संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्धाटन करण्यात आले.


सेंटरच्या संस्थापिका आणि मॅनेंजिंग डायरेक्टर डॉ. माधुरी रॉय यांनी संस्थेच्या यशामध्ये वाटा असणार्‍या सर्वांचे आभार व्यक्‍त केले. अधिकारी, विक्रेता, रुग्ण आणि सेंटरच्या सर्व टीममुळे यशाचा मार्ग मिळाला, असल्याचे प्रतिपादन डॉ. माधुरी रॉय यांनी केले. तसेच दर्जेदार युरोपीयन तंत्रज्ञान वापरून त्याचा भारतातील नागरिकांना लाभ व्हावा, या उद्देशाने हे सेंटर सुरू केल्याचे प्रतिपादन डॉ. माधुरी रॉय यांनी केले.
डॉ. पवन साळवे म्हणाले की, या सेंटरमुळे ज्यांना मुल हवे आहे, अशा पालकांना त्याचा निश्‍चित लाभ होणार आहे. लग्न झालेल्या दांम्पत्यामध्ये मुल न होणे ही समस्या मोठी बनली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य पसरत आहे. डॉ. माधुरी रॉय यांनी हे सेंटर सुरू केल्यामुळे त्याचा सर्वसामान्यांनाही लाभ होणार आहे. हे सेंटर तालुका व जिल्हा स्तरावर सुरू करावे, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.
अतिरिक्‍त आयुक्‍त उल्हास जगताप यांनी सेंटरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. अनिल बनकर यांनी आंतरराष्ट्रीय मेडिकल ट्युरिझम इंडस्ट्रीजचा अनुभव या वेळी सर्वांसमोर कथन केला. या सेंटरचा तालुका आणि जिल्हा पातळीवर व्याप वाढविला तर नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्‍त केले.

Share this: