बातम्यामहाराष्ट्र

‘सेट’ परीक्षा आता सुधारीत वेळापत्रकानुसार २८ जूनला होणार

पुणे :- महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणारी ‘सेट’ परीक्षा आता सुधारीत वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा २० जून रोजी संपणार आहे..

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २१ जून रोजी होणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये किंवा विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये, यासाठी ही परीक्षा आता २८ जून रोजी घेण्यात येईल. ‘सेट’ परीक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबवली जाते. याबाबत सविस्तर माहिती http://setexam.unipune.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Share this: