बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शिवजयंती निमित्त अवघ्या १० रूपयात “रयतेचा राजा शिवाजी” पुस्तक उपलब्ध

पिंपरी (वास्तव संघर्ष) शिवरायांच्या पराक्रमी कार्याची महती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी येथील अंशुल प्रकाशनने फक्त १० रूपयात “ रयतेचा राजा” हे पुस्तक सुपर सवलतीत उपलब्ध केले आहे.
ही विशेष व खास आॅफर फक्त शिवजयंती पुरती मर्यादित आहे.६८ पानांच्या असलेल्या या पाॅकेट बुकचे प्रकाशन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची ओळख चित्र व माहितीच्या माध्यमातून प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले यांनी उलगडली आहे.

शाळा , महाविदयालये, युवक, युवती यांना डोळयासमोर ठेऊन या पुस्तकाची रचना करण्यात आली असल्याचे अंशुल प्रकाशनचे विजय जगताप यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी आणि पुस्तक खरेदी करण्यासाठी संपर्क :-अंशुल प्रकाशन , श्रीकुंज अपार्टमेंट , विवेक नगर , आकुर्डी फोन, ९८२२०४२५१५

Share this: