पत्रकार , कलाकार , खेळाडूंना नगरसेवक प्रभाग सदस्यपदी संधी द्या – विक्रम पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्विकृत नगरसेवक प्रभाग सदस्य पद सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार , कलाकार , खेळाडू यांना संधी देण्यात यावी . राजकीय उमेदवार कायद्याने यासाठी अपात्र आहेत . त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आगामी स्विकृत नगरसेवक प्रभाग सदस्य निवडणूक रद्द करावी .

पालिकेतील सभागृह नेते यांनी या मुद्द्याची तातडीने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी केली आहे.

Share this: