दीड हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीसाला रंगेहाथ अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) -दुकानाचा करार संपल्यानंतर तक्रारदारांनी दुकानाचा ताबा सोडला नाही . याबाबत मूळ मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . या तक्रारीचा तपास महिला पोलीस हवालदार यांच्याकडे होता त्यांनी दुकान खाली करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) जाळ्यात अडकली आहे . ही कारवाई आज बुधवारी ( दि. ४ मार्च ) रोजी करण्यात आली आहे .

संगीता विनोद गायकवाड ( वय ४८ ) असे पोलीस हवालदार महिलेचे नाव आहे . याप्रकरणी ३५ वर्षीय इसमाने तक्रार दिली आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार , तक्रारदाराने ६० फुटी डी पी रोड , पिंपळे गुरव येथे भाडेतत्त्वावर दुकान होते . दुकानाचा करार संपल्यानंतर तक्रारदारांनी दुकानाचा ताबा सोडला नाही . याबाबत मूळ मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . या तक्रारीचा तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड यांच्याकडे होता .

गायकवाड यांनी भाडेकरू दुकानदाराकडे दुकान खाली करण्यासाठी वाढीव मुदत देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली . तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले . त्यातील दीड हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले आहे . ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर , पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे , पोलीस कर्मचारी अंकुश माने , श्रीकृष्ण कुंभार , चालक जाधव यांच्या पथकाने केली आहे .

Share this: