वास्तव संघर्ष बातमीची दखल :गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना आज दिले घरपोच अन्न

पिंपरी (वास्तव संघर्ष) संपूर्ण देश सध्या करोनाच्या संकटाशी लढतो आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. काही रुग्णांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांत करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. या काळात पोलिस यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी हे दिवस रात्र मेहनत करत आहेत.

मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना उपासमारीची वेळ आली होती. रेशनिंग दुकानदारांनी गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना धान्य द्यावे यावर वास्तव संघर्ष ने बातमी देखील केली होती. गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांचे हाल नगरसेवक समिरदादा मासूळकर आणि महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांना बघवत नव्हते त्यांनी लागलीच बातमीची दखल घेऊन. आज दिनांक 30 मार्च 2020 रोजी अन्नामृत फाउंडेशन मासूळकर काॅलनी यांच्या मार्फत गांधीनगरवासियांना रोज जेवण दिले.

दरम्यान आवाज भारताच्या संपादिका मंदा बनसोडे यांनी सदरील गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांचे प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. गांधीनगर झोपडपट्टी सर्व गोरगरिबांना अन्न पोहोचवण्याचे काम पञकार दिपक साबळे, अॅड. अशोक बडेकर, निलेश हेद्रे अजय शेरखाने, चंद्रकांत बोचकुरे,सिद्धार्थ शिरसाठ विक्की शिंदे,जितेश खिल्लारे, अक्षय जोगदंड, गणेश खरात, विजय गायकवाड, सनी वडमारे उमेश कांबळे, विशाल पवळ, मनोज मोरे, मनोज गायकवाड, संदिप गायकवाड, मनोज गजभार, समाधान गजभार, योगेश अडागळे, संजय गायकवाड या गांधीनगरमधील तरूणांनी केले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक समिरदादा मासूळकर म्हणाले, लॉकडाऊनचा कालावधीत वाढ होऊ शकते ही शक्यता गृहीत धरता आम्ही प्रभागातील गोरगरिबांना अन्न पोहचवत आहोत चुकुन माकुन एखादा परिसरातील नागरिक रहात असेल मात्र हे देखील तुम्ही पञकार म्हणून समोर आणत आहात यापुढे रोज गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना अन्नामृत फाउंडेशन अन्न देण्याचे पुढील नियोजन करणार आहे .

Share this: