क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संचारबंदीत तरूणींना वाढदिवसांचा केक पडला महागात ;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) सध्या संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे . पिंपरी चिंचवडमध्ये आता कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे रस्त्यावर केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये , यासाठी नागरिकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत . अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर येऊन सामाजिक अंतर राखून काम होताच घरात जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी दिली आहे. असे असताना वाकड परिसरात अंदाजे 25 – 26 वयाच्या दोन तरुणी वाढदिवसाचा केक आणण्यासाठी घराबाहेर पडल्या .

त्यानंतर त्या दोघी केक घेऊन जाताना पोलिसांच्या नजरेस पडल्या . पोलिसांनी त्यांना घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले . मात्र , कारण न सांगता तरुणींनी सरळ पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली . बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणींवर गुन्हा दाखल करा , असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले . गुन्हा दाखल होण्याचे ऐकताच तरुणींनी लगेच नारमाईची भूमिका घेतली . मात्र , पोलिसांपुढे हुज्जतीनंतरच्या माफीचा काहीही उपयोग झाला नाही . दोन्ही तरुणींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

Share this: